पीएम किसान योजना 24 वा हप्ता या दिवशी होणार जमा | PM Kisan Yojana 24th Installment Date
PM Kisan Yojana 24th Installment Date : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, कारण पीएम किसान योजनेचा 24 व हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अखेर प्रतीक्षा संपली. हा हप्ता कोणाला मिळणार आणि केंव्हा जमा होणार सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
PM Kisan Yojana 24th Installment Date
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये समान 3 हप्त्यामध्ये दिले जातात. 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. आता लाभार्थी शेतकऱ्यांना 24 वा हप्ता 30 ऑक्टोंबर 2026 रोजी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
24 व्या हप्त्याचे 2000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?
योजनेच्या नियमांनुसार पात्र असलेल्या आणि आवश्यक पडताळणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता मिळेल. यासाठी e-KYC पूर्ण असणे, बँक खात्याची माहिती योग्य असणे म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याला (NPCI) DBT लिंक असणे गरजेचे आहे. आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला असावा.
आपली संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही, हे चेक करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अर्जाचे स्टेटस चेक करावे. स्टेटस मध्ये खालील प्रमाणे स्टेटस असणे गरजेचे आहे.

