लाडकी बहीण e-KYC पुन्हा सुरू झाली का? पहा संपूर्ण माहिती | Ladki Bahin Yojana KYC Update
लाडकी बहीण योजना e-KYC Update 2026: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सध्या e-KYC बाबत सोशल मीडियावर विविध माहिती टाकली जात आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये e-KYC पुन्हा सुरू झाली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी e-KYC संदर्भातील प्रत्येक अपडेट महत्त्वाचा आहे.
लाडकी बहीण योजनेची e-KYC सुरू झाली आहे का?
सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेची e-KYC पुन्हा सुरू झाल्याचे सांगणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप लाडकी बहिण योजनेची ई केवासी (ladki bahin yojana kyc update) सुरु झालेली नाही. लाभार्थी महिलांनी अशा सोशल मीडिया पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया किंवा नवीन e-KYC लिंकबाबत शासनाकडून अधिकृत अपडेट प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवणे योग्य ठरेल. म्हणून सध्या कोणतीही अनोळखी किंवा सोशल मीडियावरून मिळालेली e-KYC लिंक वापरण्याची घाई करू नका.
सोशल मीडियावरील e-KYC लिंकवर क्लिक करू नका
लाडकी बहीण योजनेच्या नावाने सोशल मीडिया माध्यमांवर अनेक प्रकारच्या लिंक शेअर केल्या जात आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल नंबर, OTP किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती मागितली जाऊ शकते.
त्यामुळे लाभार्थी महिलांनी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरू नका.
अधिकृत माहिती कुठे तपासावी?
लाडकी बहीण योजनेशी संबंधित अधिकृत माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच माहिती तपासा.
अधिकृत वेबसाइट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ शासनाकडून e-KYC बाबत नवीन प्रक्रिया किंवा अधिकृत लिंक सुरू करण्यात आल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमातून तपासता येईल.
