पुणे जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरू | Aaple Sarkar Vacancy 2026
Aaple Sarkar Vacancy 2026 : पुणे जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) सुरू करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सुधारित नियमांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांनी ग्रामपंचायतनिहाय रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ही प्रक्रिया गुणांकन, पात्रता, पायाभूत सुविधा, मुलाखत आणि कार्यप्रदर्शन या निकषांवर आधारित असणार आहे.
डिजिटल सेवा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक, उद्योजक आणि ऑनलाइन सेवा केंद्र चालवणाऱ्या व्यक्तींना ही मोठी संधी ठरू शकते.
आपले सरकार सेवा केंद्र का सुरू करावे?
आज बहुतेक शासकीय सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, दाखले, योजना अर्ज, आधार-संबंधित सेवा, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, निवडणूक नोंदणी, शेतकरी योजना आणि इतर डिजिटल सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य पायाभूत सुविधा, संगणक, इंटरनेट आणि नागरिकांशी चांगला संवाद असल्यास हे केंद्र ग्रामीण आणि शहरी भागात उपयुक्त आणि टिकाऊ व्यवसाय ठरू शकते
अर्ज कधी आणि कुठे उपलब्ध आहेत?
अधिकृत जाहिरातीनुसार अर्ज 13 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत उपलब्ध राहतील. अर्ज, अटी व शर्ती, तसेच नमुना अर्ज पुणे जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
| पुणे जिल्हा जाहिरात | जाहिरात पहा |
| अर्ज सुरु दिनांक | 13 ऑगस्ट 2026 |
| अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 31 ऑगस्ट 2026 |
| अर्ज तपासणी | 1 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2026 |
| हरकती कालावधी | 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2026 |
| अर्जाची PDF | पहा |
| रिक्त जागा, अटी व शर्ती | PDF पहा |
अर्ज कुठे करावा आणि निवड प्रक्रिया कशी असेल?
अर्ज संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करायचे असून अर्ज स्वीकारण्याची वेळ शासकीय सुट्ट्या वगळून सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 हि असणार आहे. या वेळी शासनाने निवड प्रक्रियेत काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. निवड करताना खालील बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत.
- गुणांकनावर आधारित निवड
- किमान पात्रता
- आवश्यक पायाभूत सुविधा
- मुलाखत
- कार्यप्रदर्शनावर आधारित करार नूतनीकरण
प्राप्त अर्जांची तपासणी 1 सप्टेंबर 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयातील समितीद्वारे केली जाईल.
जर एखाद्या भौगोलिक क्षेत्रासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीचे ठिकाण आणि वेळापत्रक पुणे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केले जाईल.
प्राथमिक व अंतिम निवड यादी कधी होणार?
5 ओक्टोंबर2026 रोजी प्राथमिक यादी प्रसिद्ध होईल. प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविण्यात येतील. हरकती सादर करण्याचा कालावधी 5 ऑक्टोबर 2026 ते 9 ऑक्टोबर 2026 असा आहे. हरकती संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर कराव्या लागतील. अंतिम निवड यादी https://pune.gov.in/ या पुणे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑक्टोंबर 2026 रोजी प्रसिद्ध होईल.
पुणे आपले सरकार सेवा केंद्र 2026, Aaple Sarkar Seva Kendra Pune, पुणे जिल्हा सेवा केंद्र अर्ज, पुणे जिल्हा CSC भरती, आपले सरकार केंद्र अर्ज प्रक्रिया, Maharashtra Aaple Sarkar Kendra, Pune district seva kendra vacancy, पुणे जिल्हा ऑनलाइन सेवा केंद्र.
