जिल्हा परिषद योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु : Zilla Parishad Yojana 2026-27

जिल्हा परिषद योजना 2026, ऑनलाईन अर्ज, प्रक्रिया संपूर्ण माहिती पहा

Zilla Parishad Yojana 2026-27 : महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील नागरिकांसाठी स्वनिधीतून २०२६-२७ या वर्षाकरिता विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना सुलभतेने आणि पारदर्शकपणे मिळावा यासाठी अधिकृत ऑनलाईन अर्ज पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक किंवा नागरिक असाल, तर या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला सध्या २०२६ मध्ये सुरू असलेल्या योजना, त्यातील समाविष्ट घटक, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्जाच्या अंतिम मुदतीची संपूर्ण माहिती मिळेल.

जिल्हा परिषद स्वनिधी योजनेतील प्रमुख ५ विभाग

पुणे जिल्हा परिषदेच्या स्वनिधी पोर्टलवर खालील ५ प्रमुख विभागांमार्फत अर्ज स्वीकारले जातात.

  1. कृषी विभाग (Agriculture Department): शेतकऱ्यांना आधुनिक शेती साहित्य व सिंचन साधनांसाठी अनुदान.
  2. पशुसंवर्धन विभाग (Animal Husbandry Department): पशुपालकांसाठी आधुनिक उपकरणे व दुग्धव्यवसाय सक्षमीकरण.
  3. महिला व बाल कल्याण विभाग (Women & Child Welfare Department): महिला सक्षमीकरण व बालकल्याण उपक्रम.
  4. समाज कल्याण विभाग (Social Welfare Department): सामाजिक दृष्ट्या मागास घटकांसाठीच्या योजना.
  5. दिव्यांग कल्याण विभाग (Divyang Welfare Department): दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठीच्या विशेष योजना.

सध्या (२०२६-२७) सुरू असलेल्या योजना, समाविष्ट घटक व अंतिम मुदत

पोर्टलवर सध्या कृषी आणि पशुसंवर्धन या दोन विभागांच्या विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत

1. कृषी विभाग योजना (७५% पर्यंत अनुदान)

  1. ५ HP पाणबुडी (Submersible) इलेक्ट्रिक मोटर
  2. 7.5 HP पाणबुडी (Submersible) इलेक्ट्रिक मोटर
  3. बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप (Battery Operated Spray Pump)
  4. ताडपत्री (६×६ मीटर, ३७० GSM)
  5. ३ इंच PVC पाईप (४ kg/cm² प्रेशर)
  6. भात लावणी यंत्र ४ ओळी
  7. भात लावणी 6 ओळी

अंतिम मुदत (Deadline) 05 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

२. पशुसंवर्धन विभाग योजना (75% पर्यंत अनुदान)

  1. पशुपालकांसाठी उपयुक्त आधुनिक साहित्य व साधनसामग्री पुरवठा
    1. 15 मे. टन क्षमतेचे मुरघास युनिट तयार करणे. (किमान ५०० किलो क्षमतेच्या ३०/१५ सिलेज बॅग)
    2. कडबाकुट्टी मशीन खरेदी करणे.
    3. मुक्त संचार गोठा साहित्य पुरवठा करणे. (१० जनावरांसाठी प्रति जनावर २०० चौ.फुट प्रमाणे किमान २००० चौ. फुट क्षेत्रफळा करिता तारेचे कुंपण लोखंडी अथवा सिमेंट खांबासह)
    4. मिल्किंग मशीन खरेदी करणे (ISI मार्क असलेली किमान सिंगल बकेट)
    5. रबर मॅट किमान १० नग खरेदी करणे. (४ फुट*6फुट)
  2. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना (महिला पशुपालकांसाठी विशेष सहाय्य)
    1. महिलांना २ शेळ्या वाटप
    2. 50+5 सुधारित जातीच्या तलंगा पक्षी

अंतिम मुदत (Deadline): ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक)

पोर्टलवर अर्ज करण्यासाठी खालील टप्प्यांचा अवलंब करा:

  1. नवीन अर्जदार नोंदणी: सर्वात आधी पोर्टलवर जाऊन ‘नवीन अर्जदार‘ (New Applicant Registration) या पर्यायावर क्लिक करून आपली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  2. लॉगिन करा: नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अर्जदार लॉगीन‘ वर जाऊन तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर व पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  3. योजना निवडा: ‘विविध योजनांची माहिती’ या विभागात जाऊन पात्रतेनुसार योजनेची निवड करा.
  4. कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रांची यादी तपासून सर्व मूळ कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करा.
  5. अर्ज सबमिट करा: अर्ज पूर्ण भरून झाल्यावर ‘Submit‘ बटनावर क्लिक करा आणि अर्जाची पावती/प्रिंट काढून ठेवा.)

आवश्यक कागदपत्रे व महत्त्वाच्या लिंक्स

योजनेनुसार आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल असू शकतो. सर्वसाधारणपणे खालील कागदपत्रे मागितली जाऊ शकतात.

  • आधार कार्ड
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • उत्पन्नाचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • सातबारा व ८-अ उतारा (शेतकरी योजनांसाठी)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेची पात्रता तपासून घ्या.
  • अर्जाची अंतिम तारीख विभागनिहाय वेगळी असू शकते.
  • अनुदानाची रक्कम आणि लाभाचे स्वरूप योजनेच्या नियमांनुसार निश्चित केले जाते.
  • अर्ज केल्याने अनुदान निश्चित मिळेलच असे नाही. लाभार्थी निवड शासनाच्या नियमांनुसार केली जाते.
  • केवळ अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल – https://zppunecessyojana.com/

Similar Posts

Leave a Reply