आता घरबसल्या मिळवा रेशन कार्ड कुठेही जाण्याची गरज नाही : Ration card maharashtra apply online

ration card maharashtra online apply

Ration Card Maharashtra Apply Online : आता नागरिकांना शिधापत्रिका काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही कारण शासनाने आता नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी वेबसाईट सुरु केली आहे. यामुळे नागरिक घरबसल्या रेशन कार्ड काढू शकतात. त्याचबरोबर वेबसाईट वरून रेशन कार्ड संबधित विविध कामे करता येत आहेत.

Ration Card Maharashtra

नवीन वेबसाईट पोर्टल मधून जसे कि नवीन रेशन कार्ड काढणे, रेशन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करणे, नवीन नाव जोडणे किंवा नाव कमी करणे, त्याचबरोबर रेशन ई कार्ड डाऊनलोड करणे पत्ता बदलणे, रेशन कार्ड ट्रान्सफर करणे अशा विविध सेवा उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने हि सुविधा उपलव्ध करून दिली आहे. या सेवांमुळे राज्यातील नागरिकांना घरबसल्या रेशन कार्डची कर्मे करता येणार आहेत. यामुळे नागरिकांना रेशन कार्ड मिळविणे अधिक सोपे जाणार आहे. त्याचबरोबररेशन धारकाला प्रत्येक महिन्याला किती रेशन धान्य मिळत आहे याची सुद्धा माहिती सहज पाहता येते.

Ration card apply online maharashtra

नागरिकांना आता पुरवठा शाखेत न जाता https://rcms.mahafood.gov.in/ या शासनाच्या अधिकृत पोर्टल वरती रेशन कार्ड संबधित ऑनलाईन केम करता येणार आहेत. त्याच बरोबर नवीन रेशन कार्ड काढू शकतात. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कुटुंबाचे एकून वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात ४४००० हजार रुपये पेक्षा जास्त नसावे, व शहरी भागात ५९ हजार पेक्षा जास्त उत्पन्न नसावे. राष्ट्रीय अन्न सुरुक्षा अधिनियमा अंतर्गत पात्र नागरिकांना प्रति व्यक्ती प्रति ५ किलो अन्नधान्य दिले जाते.

नागरिक पोर्टल च्या माध्यमातून अंत्योदय अन्न शिधापत्रिका (AAY), प्राधान्य कुटुंब योजना (PHH) राष्ट्रीय अन्न सुरुक्षा (NPH), राज्य योजने अंतर्गत APL Farmer अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. ओळखपत्र पुरावा
    • आधार कार्ड
    • मतदान कार्ड
    • PAN कार्ड
    • नाव व फोटो असलेले ओळखपत्र
    • ड्रायव्हिंग लायसन्स
    • पासपोर्ट (यापैकी कोणतेही एक)
  2. रहिवाशी पुरावा
    • मतदान कार्ड
    • पासपोर्ट
    • ड्रायव्हिंग लायसन्स
    • वीज बिल
    • टेलिफोन बिल
    • भाडे करार (यापैकी कोणतेही एक)
  3. इतर कागदपत्रे
    • तहसीलदार उत्पन्न दाखला
    • मृत्यू दाखला (नाव कमी करण्यासाठी)
    • जन्म दाखला (नाव जोडण्यासाठी/वाढविण्यासाठी)
    • एखाद्या सदस्याचे नाव वाढविणे किंवा कमी करणे बाबतचे प्रतिज्ञा पत्र

मित्रांनो रेशन कार्ड संबधित कोणतेही ऑनलाईन काम करायचे असल्यास कुटुंब प्रमुखाच्या नावाने नोंदणी करावी, तसेच नोंदणी करण्यासाठी अर्जदार/कुटुंबप्रमुख च्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Similar Posts

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *