Pik Pera Form : खरीप/रब्बी पीक पेरा स्वयंघोषणापत्र डाउनलोड करा

Pik pera form

Pik Pera Form : शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पीक पेरा फॉर्म, म्हणजेच पिक पेरा स्वयंघोषणा पत्र द्यावे लागते. पीक पेरा फॉर्म मध्ये शेतकऱ्याने लागवड केलेल्या पीकाबद्दल माहिती दिलेली असते. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी हा पीक पेरा फॉर्म स्वयं घोषणा पत्र लागते.

pik pera swayam ghoshna patra pdf

पीक पेरा फॉर्म (Crop Sowing Form) हा एक अत्यंत महत्त्वाचा शासकीय दस्तऐवज आहे, जो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कोणते पीक, किती क्षेत्रावर, कोणत्या हंगामात पेरले गेले आहे. याची नोंद करण्यासाठी वापरला जातो. हा पीक पेरा फॉर्म पीक विमा अर्जासोबत जोडावा लागतो.

Pik Pera Form 2025

खरीप पीक पेरा फॉर्म स्वयंघोषणापत्र ( Kharip pik pera form): खरीप हंगाम (जून ते ऑक्टोबर) या काळात लावली जाणारी पीके जसे की भात, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, कापूस इतर पिकांसाठी खरीप पीक पेरा फॉर्म भरला जातो.

रब्बी पीक पेरा फॉर्म (Rabbi pik pera form) : रब्बी हंगाम (ऑक्टोबर ते मार्च) मध्ये घेतली जाणारी पीके जसे की हरभरा, गहू, ज्वारी, मका (उन्हाळी), कांदा, बटाटा इतर पिकांसाठी पीक विमा अर्ज भरताना हा फॉर्म भरला जातो.

पीक पेरा स्वयंघोषणापत्र : काही वेळा शेतकऱ्यांकडे तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांचे साक्षांकित पिकांचे दस्तऐवज नसतात. अशा परिस्थितीत शेतकरी स्वतः एक स्वयंघोषणा पत्र देतो, ज्यात तो लिहून देतो की, “मी अमुक क्षेत्रात अमुक पीक अमुक तारखेला घेतले आहे.” हे पत्र स्वाक्षरीसह दिले जाते

Pik pera format

पीक पेरा फॉर्म मध्ये सामन्यात खालील प्रमाणे माहिती असते.

  • शेतकऱ्याचे नाव
  • सातबारा उताऱ्यावर आधारित गट क्र. /गट न.
  • पीकाचे नाव
  • पेरणीची तारीख
  • क्षेत्र (गुंठे/हे.)
  • सिंचन सुविधा
  • पीक प्रकार
  • शेतकऱ्याची सही

पीक पेरा फॉर्म स्वयंघोषणा पत्राचा उपयोग केंव्हा केला जातो.

स्वतःच्या जबाबदारीवर पिकांची माहिती सादर करण्यासाठी स्वयंघोषणा पत्र वापरले जाते. हे मुख्यतः अशा वेळेस उपयुक्त असते, जेव्हा तलाठ्याकडून प्रत्यक्ष पीक पाहणी शक्य नसते. तसेचअचानक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दावे दाखल करायचे असतात. पीक विमा क्लेमसाठी सरकार कडून मागवले जाते. नैसर्गिक आपत्ती वेळी मदत मिळविण्यासाठी पिक पेरा स्वयंघोषणा पत्राचा उपयोग होतो.

Pik Vima Swayam Ghoshna Patra Download Pik Pera PDF Form

खरीप पीक पेरा फॉर्म स्वयंघोषणा पत्रडाऊन+लोड
रब्बी पीक पेरा फॉर्म स्वयंघोषणा पत्रडाऊन+लोड
पिक विमा अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईटhttps://pmfby.gov.in/

निष्कर्ष

पीक पेरा फॉर्म, रब्बी पीक पेरा स्वयंघोषणा पत्र व खरीप पिक पेरा स्वयंघोषणा पत्र हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक दस्तऐवज आहेत. सरकार व कृषी विभागासमोर आपली पीक स्थिती योग्य रीतीने मांडण्यासाठी व कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी याचा उपयोग होतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *