लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार पहा नवीन शासन निर्णय आला

Ladki Bahin Yojana Next Installment

Ladki Bahin Yojana Next Installment : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहिण योजनेचा लवकरच ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरीत केला जाणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली लाडकी बहिण योजना हि राज्यातील सर्वात चर्चेतील आणि लोकप्रिय योजना ठरत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. असा महत्वाचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो बहिणींना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केले होते कि, लाडकी बहिण योजनेच्या प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेला दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार. त्यानुसार अनेक लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये दर महिन्याला मिळत आहे. आता लवकरच लाभार्थींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. शासन निर्णयानुसार सर्व पात्र लाभार्थींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
नवीन शासन निर्णयपहा

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासन निर्णयामध्ये लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी केवायसी संबधित कोणतीही माहिती दिलेली नाही. यामुळे लाभार्थींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थींना मिळू शकतो. जे लाभार्थी केवायसी करतील तसेच जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत अशा दोन्ही लाभार्थी महिलांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता मिळू शकतो.

केवायसी करताना खालील गोष्टीची काळजी घ्यावी.

  • आधार कार्ड वरील बँक खात्यावरील नाव एकसारखे असावे.
  • बँक खाते सक्रीय (Active) असावे आणि DBT साठी योग्य असावे.
  • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा.
  • केवायसी करताना सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून केवायसी फॉर्म सबमिट करावा.
  • चुकीची माहिती भरल्यासा हप्ता बंद होऊ शकतो.

Similar Posts

2 Comments

    1. आता तरी त्यामध्ये बदल करता येत नाही, परत्नू नंतर जर काही पर्याय आला तर माहिती जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *