लाडकी बहिण योजना या महिलांचे 1500 रुपये बंद : Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update

Ladki Bahin Yojana New Update : लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्वाची माहिती, आता फक्त याच महिलांना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये. कोणाला मिळणार लाडकी बहिण योजनेचा लाभ व कोणत्या महिलांचे 1500 रुपये बंद होणार पहा संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Yojana New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार मिळत आहेत, ज्या महिलांना योजनेचे दीड हजार रुपये मिळत नसतील अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणे गरजेचे आहे, ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही अशा महिलांना योजनेचे दीड हजार मिळणार नाहीत.

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी अनेक महिला योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत हे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शासनाने अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु केली आहे. यामधून अनेक महिलांचे अर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरत आहे. आता प्राप्तीकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देयात मान्यता दिली आहे, यामुळे आयकर भरणारे (Income Tax Return) लाभार्थी महिलांची यादी लवकरच तयार केली जाणार आहे, यामुळे या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यापूर्वी योजनेचा अटी व शर्ती, पात्रता/अपात्रता या बद्दल शासन निर्णयाद्वारे माहिती दिली होती, परंतु यामध्ये अपात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांनी देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले होते. आता अशा अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्या महिला यामध्ये अपात्र ठरतील अशा महिलांना लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत.

कोणत्या महिलांना मिळणार लाडकी बहिण योजनेचा लाभ पहा

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला हि महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • विवाहित, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता, आणि निराधार महिला तसेच कुटुंबामधील एक अविवाहित महिला यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • तसेच लाभार्थीचे वय हे २१ ते ६५ दरम्यान असावे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याला (DBT) लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख (२.५० लाख) पेक्षा जास्त नसावे.

Similar Posts

2 Comments

    1. आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का चेक करा, तसेच आपला अर्ज मंजूर झाला आहे का चेक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *