लाडकी बहिण योजना KYC करण्यासाठी मिळाली मुदतवाढ : Ladki Bahin Yojana e-KYC Date Extended

Ladki Bahin Yojana e-KYC Date Extended

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीबाबत एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापूर्वी ई-KYC करण्यासाठी अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली होती. मात्र राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि तांत्रिक अडचणीमुळे हजारो महिलांचे केवायसी प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने अंतिम तारीख (Ladki Bahin Yojana e-KYC Date Extended) वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे.

ई-KYC का आवश्यक आहे?

लाडकी बहिण योजना हि महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी राबवली जाणारी अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ महिलाच्या खात्यात वेळेवर जमा होण्यासाठी तसेच ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी E-KYC अनिवार्य केली आहे.

ई-KYC पूर्ण केल्याशिवाय लाभार्थीच्या खात्यावर कोणताही लाभ जमा होणार नाही त्यामुळे महिलांनी शक्य तितक्या लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थीचे आधार कार्ड
  • लाभार्थी अविवाहित असेल तर वडिलांचे आधार कार्ड
  • लाभार्थी विवाहित असेल तर पतीचे आधार
  • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

ई-केवायसी लाभार्थी मोबाईल वरून करू शकतात, मोबाईल वरून केवायसी करणे शक्य नसल्यास जवळील ऑनलाईन सेवा केंद्रावर जावून आपले ई-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईट वरून लाभार्थींना ई-KYC करता येईल.

लाडकी बहिण योजना KYC बाबत

शासनाने सर्व पात्र लाभार्थी महिलांना लवकरात लवकर आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे ज्या महिलांनी अजून आपली ई-KYC केली नसेल त्यांनी आजच आपली केवायसी करून घ्यावी. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र असाल तरच योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला मिळू शकतो. शासनाने आता ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे यामुळे लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली KYC करता येणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *