लाडकी बहिण KYC चुकीची झाली आहे का? पुन्हा KYC करण्याची लिंक सुरु
Ladki Bahin KYC correction : राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात, शासनाने लाडकी बहिण योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. बऱ्याच लाभार्थी महिलांकडून केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला होता. यामुळे त्यांना मिळणारा लाभ म्हणजेच १५०० रुपये जमा होणे बंद झाले होते.
लाडकी बहिण योजना केवायसी दुरुस्त करण्यासाठी वेबसाईट सुरु
ज्या महिलांकडून केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला होता, अशा महिलांना पुन्हा केवायसी करता येणार आहे. यामुळे अशा लाभार्थी महिलांना बंद झालेला लाभ म्हणजेच लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये बंद झालेले पुन्हा सुरु होतील. केवायसी करताना लाभार्थी महिलांनी दिलेला पर्याय वाचून योग्य तो पर्याय निवडायचा आहे, आपण जर पुन्हा चुकीचा पर्याय निवडला तर आपल्याला पुन्हा केवायसी करता येणार नाही. आणि आपला मिळणारा लाभ बंद देखील होऊ शकतो. यामुळे केवायसी करताना आपण निवडलेला पर्याय बरोबर आहे का याची खात्री करा नंतर केवायसी फॉर्म सबमिट करा.
लाडकी बहिण योजनेची केवायसी दुरुस्त कशी करावी?
लाडकी बहिण योजनेची केवायसी दुरुस्त करण्यासाठी शासनाने लाडकी बहिण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईट वरती पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. लाडकी बहिण योजनेची अधिकृत वेबसाईट मोबाईल मध्ये ओपन करा. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालील फोटो प्रमाणे पर्याय पाहायला मिळतील.

- हि eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. या प्रमाणे पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर केवायसी करण्याची लिंक ओपन होईल. त्याठिकाणी लाभार्थी आपली माहिती भरून केवायसी करू शकतात.
- केवायसी करण्यासाठी डायरेक्ट लिंक : https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
