लाडकी बहिण लाभार्थींना ई केवायसी करणे बंधनकारक : e kyc Ladki Bahin Yojana

e kyc ladki bahin yojana maharashtra

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली गेली. योजनेमधून पात्र लाभार्थी महिलेला दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत. यामुळे गरजू महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. परंतु आता शासनाकडून लाडकी बहिण योजना लाभार्थ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जर हि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाहीतर त्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहिण योजना ई-केवायसी म्हणजे काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली जाणार आहे, जर केवायसी केली नाहीतर त्या लाभार्थी व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच ई केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थ्याची ओळख तसेच पात्रता तपासता येणार आहे. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि, ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसून देखील योजनेचा लाभ घेत आहे. यामुळे आता प्रत्येक लाभार्थी महिलेला ईकेवायसी करणे गरजेचे आहे. ई केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थीचे आधार कार्ड ची पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहिण योजना शासनाने लाडकी बहिण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती ekyc पर्याय उपलब्ध करून दिला आहे. लाभार्थी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईटवरून लाभार्थी केवायसी करू शकतात. अजून लाडकी बहिण योजनेची केवायसी वेबसाईट सुरु झाली नाही. वेबसाईट सुरु झाल्यानंतर लाभार्थी केवायसी करू शकतात.

ई-केवयासी करणे का आवश्यक आहे?

  • लाभार्थी पात्र आहे कि नाही हे चेक करता येते
  • चुकीच्या बँक खात्यावर पैसे जाण्याचा धोका नसतो
  • योजना अधिक पारदर्शक होते
  • केवायसी करण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे

लाडकी बहिण योजना महत्वाची माहिती

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
अर्जदाराचे वय२१ ते ६५ दरम्यान असावे
मिळणारा लाभ१५०० रुपये

लाडकी बहिण योजनेची केवायसी कशी करावी?

  • https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्याठिकाणी आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी पर्याय दिलेला आहे, त्याठिकाणी आधार कार्ड नंबर भरावा.
  • त्यानंतर captcha कोड भरून मी सहमत आहे पर्याय निवडून ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
  • आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ६ अंकी ओटीपी येईल तो टाकून verify करून घ्या.
  • पुढील प्रक्रिया लवकरच अपडेट केली जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *