HSRP नंबर प्लेट लावण्याची हि आहे शेवटची तारीख पहा : HSRP Number Plate Maharashtra

HSRP Number Plate Maharashtra : सर्व वाहन धारकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, कारण शासनाने आता प्रत्येक वाहनाला एचएसआरपी म्हणजेच High Security Registration Plate लावणे बंधनकारक केले आहे. HSRP नंबर प्लेट नाही लावली तर दंड देखील होऊ शकतो. यामुळे प्रत्येक वाहन धारकाने आपल्या वाहनाला एचएसआरपी नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे.
HSRP Number Plate Maharashtra
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना हि नंबर प्लेट बसविणे गरजेचे आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहन धारकाने सर्व प्रथम ऑनलाईन HSRP नंबर प्लेट बुकिंग करणे आवश्यक आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरच एचएसआरपी नंबर प्लेट आपण निवडलेल्या फिटमेंट सेंटर वरती येईल व त्याठिकाणी जावून नंबर प्लेट बसवता येईल.
HSRP number plate last date शासनाने हि नंबर प्लेट बुक करण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदत दिली होती. परंतु अनेक वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बाकी असल्यामुळे नागरिकांकडून मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असल्यामुळे शासनाने आता पुन्हा मुदतवाढ केली आहे. आता नागरिकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत HSRP नंबर प्लेट बुक करता येणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट बुक कुठे करायची.
शासनाने नंबर प्लेट बुक करण्यासाठी Zone Wise ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिक https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या संकेतस्थळावरून नंबर प्लेट बुक करू शकतात.
HSRP नंबर प्लेटचे फायदे
एचएसआरपी नंबर प्लेटचे अनेक फायदे आहेत जसे कि हि नंबर प्लेट कोणीही बनावट प्लेट बनवू शकत नाही. यामुळे त्या वाहनाची सुरक्षा अजून वाढते. व ती एकदा बसवल्यानंतर पुन्हा काढता येत नाही. यामुळे त्याची चोरी होणे गैरप्रकार करता येत नाही. सर्व वाहनांची नंबर प्लेट एक सारखी असल्यामुळे वाहनाची ओळख पटविणे अधिक सोपे जाते.