ई पीक पाहणी करण्यासाठी मिळाली मुदतवाढ : e pik pahani last date
e pik pahani last date शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण ई पीक पाहणी करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पिकाची नोंद ७/१२ वरती म्हणजेच पिक पाहणी पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण पिक पाहणी केली तरच त्या शेतकऱ्याला पिक कर्ज असेल किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेता येतो.
e pik pahani last date in maharashtra
खरीप हंगामातील ई पिक पाहणी राज्यात १ ऑगस्ट २०२५ पासून शेतकरी स्तरावर सुरु करण्यात आली होती. पिक पाहणी करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ देण्यात आली होती परंतु आता शासनाने खरीप हंगामातील पिक पाहणी करण्याची मुदत १५ सप्टेंबर वरून २० सप्टेंबर २०२५ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना २० सप्टेंबर २०२५ पर्यंत पिक पाहणी करता येणार आहे, पीक पाहणी कशी करायची पहा.
पीक पाहणी केली तरच त्या शेतकऱ्याला पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ वरती पिकाची नोंद असणे गरजेचे असते. उदा. पिक कर्ज घेण्यासाठी, पिक विमा योजना, नुकसान भरपाई योजना इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी पिकाची नोंद सातबारा वरती असावी लागते.
पीक पाहणी करण्यापूर्वी खालील माहिती वाचा
- ई पीक पाहणी करण्यापूर्वी आपल्या मोबाईल मधील E-Pik pahani DCS अँप अपडेट करून घ्यावे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी करणे आवश्यक आहे.
- ज्या गटातील पिकाची नोंद लावायची आहे त्याच गटामध्ये फोटो काढावा.
- पिकाची मध्यभागी उभा राहून फोटो काढा.
- ज्या पिकाची नोंद लावायची आहे त्याच पिकाचा फोटो काढा.
- पिकाचे क्षेत्र माहिती अचूक भरावी, एकदा सातबारा वरती नोंद झाल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही.
- ४८ तासापूर्वी शेतकऱ्याला पिकाची माहिती दुरुस्त करता येते.
