E pik pahani 2025 : पीक पाहणी झाली सुरु हि आहे शेवटची तारीख
ई पीक पाहणी म्हणजे काय? (What is E-Pik Pahani Registration) ई पीक पाहणी नोंदणी 2025 ही महाराष्ट्र शासनाची एक डिजिटल सेवा आहे ज्यात शेतकरी आपल्या शेतातील पीक निवड, क्षेत्रफळ, छायाचित्र आणि GPS माहिती ‘ई पीक पाहणी DCS’ मोबाईल अँपच्या माध्यमातून ऑनलाईन भरू शकतात. या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक शेतकऱ्याची पीक माहिती गोळा करून शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ तत्पर आणि पारदर्शक पद्धतीने देणे आहे.
E Pik Pahani Registration 2025 प्रक्रिया
दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून राज्यात खरीप २०२५ हंगामातील पीक पाहणी प्रक्रिया सुरु झाली असून पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत हि 14 सप्टेंबर 2025 हि असणार आहे. शेतकऱ्यांना E-Pik Pahani DCS मोबाईल अँप द्वारे शेतकऱ्यांना शेतातील पिक पाहणी करता येणार आहे. म्हणजेच शेतातील पिकाची पाण्याच्या स्त्रोताची माहिती नोंदवू शकतात.
काही शेतकऱ्यांना अँपमध्ये लॉगीन अथवा नोंदणी करताना अडथळे येऊ शकतात. तांत्रिक अडचणीसाठी DCS App सपोर्ट टीमला संपर्क करा किंवा अँप अपडेट करा. किंवा दुसऱ्या मोबाईल वरून पिक नोंदणी करा.
ई पीक पाहणीचे महत्व आणि फायदे
- डिजिटल नोंदणी: घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सोपी सुविधा.
- ऑर्गेनिक Agriculture Data: शासनाला पारदर्शी आणि अद्ययावत कृषी डेटाचा लाभ.
- योजनेचा लाभ: अचूक माहितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान, नुकसान भरपाई व इतर कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळतो.
- स्वतःच्या हाताने नोंद शेतकरी स्वतःच आपल्या शेतात, मोबाईलवरून प्रत्यक्ष नोंद करू शकतो.
पीक पाहणी कशी करावी?
- मोबाईल मध्ये गुगल प्ले-स्टोर वरून E-Peek Pahani हे अँप डाउनलोड करून घ्यावे.
- अँपमध्ये जिल्हा-तालुका-गाव निवडा.
- मोबाईल नंबर टाका व ओटीपी मिळवा.
- शेताचा सातबारा निवडा व खाते क्रमांक निवडा.
- पिक पाहणी नोंदविण्यासाठी पिकाची माहिती नोंदवा पर्याय निवडा.
- गट नंबर, पिकाचे क्षेत्र, पिकाचे नाव, फोटो, GPS लोकेशन भरावे.
- माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
४८ तासानंतर आपण लावलेली पिकाची नोंद ७/१२ उतारा वरती येईल.
ई पिक पाहणी करताना हे काम करा?
- मोबाईल मध्ये नवीन अपडेट झालेले अँप घ्यावे.
- आपण ज्या पिकाची नोंद करीत आहात त्याचा पिकाचा फोटो घ्या.
- फोटो काढताना पिकाच्या मध्यभागी राहून फोटो काढा.
- कमीत कमी २० मीटर च्या आत लोकेशन दाखवत असल्यास फोटो काढा.
