बियाणे अनुदान योजना अर्ज सुरु : Biyane Anudan Yojana 2025

Biyane Anudan Yojana Maharashtra : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरीप हंगाम २०२५ करिता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदानवर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. या लेखामध्ये योजनेबद्दल माहिती, अर्ज कुठे करायचा व कागदपत्रे काय लागतात? यासंबधित सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.
Biyane Anudan Yojana 2025
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध शेतीउपयोगी योजना राबविल्या जातात, योजनेमधून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान दिले जाते. आता खरीप हंगाम २०२५ शेतकऱ्यांसाठी अनुदानामध्ये बियाणे दिली जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्यासाठी शासनाने mahadbt biyane anudan महाडीबीटी-MahaDBT Farmer पोर्टल वरती अर्ज भरण्यासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाडीबीटी पोर्टल वरती बियाणे अनुदानसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 करिता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर प्रात्यक्षिक/प्रमाणित बियाणे अनुदान, घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका, बाजरी व भात इ. महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज भरता येईल.
Biyane anudan maharashtra
MahaDBT Farmer Scheme-महाडीबीटी पोर्टल वर बियाणे घटकासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड हि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने होणार आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रथम येतील त्याच शेतकऱ्यांची निवड होणार आहे. तसेच निवड झालेल्या लाभार्थींना त्यांच्या नोंदणीकृत/रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरती निवडीचा SMS पाठविला जाईल. आणि निवड झालेल्या लाभार्थींनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी वेबसाईट : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
Biyane Anudan Yojana Last Date
बियाणे अनुदान योजना फॉर्म भरण्याची अंतिम मुदत हि २९ मे २०२५ असणार आहे व बियाणे अनुदान योजनेची सोडत १ ते ३ जून २०२५ या दरम्यान होईल.