आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे? आत्ताच चेक करा : Aadhar card Link Bank Account check

Aadhar card Link Bank Account check

Aadhar card Link Bank Account check : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्वाच ओळखपत्र आहे. सरकारी योजना, बँक व्यवहार सबसिडी/अनुदान मिळविणे, किंवा KYC प्रक्रिया सर्व ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

आधार कार्ड बँकेशी लिंक का असावे?

जेंव्हा आपले बँक खाते आधारशी जोडलेले असते, तेंव्हा आपल्याला सरकार कडून मिळणाऱ्या डीबीटी योजनांचा लाभ/आर्थिक मदत थेट खात्यात मिळते. उदा. GAS अनुदान, पीएम किसान सन्मान निधी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, स्कॉलरशिप व इतर आर्थिक सहाय्य योजना याची मिळणारी आर्थिक मदत हि थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे कोणतीही शासकीय लाभासाठी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे? हे तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे आपण दोन पद्धतीने चेक करू शकता.

  • UIDAI च्या द्वारे आणि NPCI च्या वेबसाईटद्वारे या दोन पद्धतीने आपण आपण आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे पाहू शकता. आपण याठिकाणी UIDAI च्या वेबसाईट वरून आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे पाहणार आहोत.
  • सर्व प्रथम UIDAI च्या वेबसाईटला भेट द्या.
  • UIDAI वेबसाईट : https://myaadhaar.uidai.gov.in/en_IN
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला Login पर्याय दिसेल, तो पर्याय निवडा.
  • नंतर आधार क्रमांक टाका आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून Login With OTP पर्यायावर क्लिक करा.
  • आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून Login बटन वरती क्लिक करा.
  • लॉगीन झाल्यानंतर Bank Seeding Satus हा पर्याय निवडा म्हणजेच त्यावरती क्लिक करा.
  • आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे, त्या बँकेचे नाव त्याठिकाणी दाखवले जाईल.
  • तसेच ते Active आहे का? InActive आहे हे सुद्धा पाहायला मिळेल.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *