दहावीचा निकाल आज जाहीर होणार, येथून निकाल पहा : SSC Result 2025 Date Declared

SSC Result 2025 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, दहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी याठिकाणी काही वेबसाईट लिंक दिलेल्या आहेत, त्यावरून विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
खालील वेबसाईट वरून विद्यार्थी निकाल पाहू शकतात.